जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भवानीनगर येथील पानटपरीवर दोन जणांनी एका तरुणाला कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र नवल पाटील (वय-३४) रा. हनुमान नगर, आयोध्या नगर, जळगाव हा तरुण दुकान चालवून उदरनिर्वाह करतो. बुधवार १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जगवानी नगरातील मामाजी हॉटेलजवळ असलेल्या पानटपरीवर सिगरेट घेण्यासाठी राजेंद्र पाटील गेला. त्यावेळी त्यावेळी बाजूला उभा असलेला आकाश अहिरे यांने सांगितले की, तू सिगरेट घे व इथून निघून जा, माझ्याकडे का पाहतो असे बोलून शिवीगाळ केली. त्यानंतर सुनिता अहिरे हिनेदेखील शिवीगाळ केली तर आकाशाने कुर्हाडीने मारहाण केल्याने राजेंद्र पाटील त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखमी राजेंद्र पाटील यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. दरम्यान याबाबत रात्री ११ वाजता राजेंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आकाश अहिरे, सुनीता अहिरे दोन्ही रा. मामाजी हॉटेलच्या बाजूला जगवाणी नगर, जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.