जळगाव प्रतिनिधी । भावाच्या खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नको, म्हणत सोनू अशोक सपकाळे (रा. शिवाजीनगर) या तरूणाला २३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास अज्ञात तीन जणांनी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तीन महिन्यांपूर्वी माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश सपकाळे याचा खून करण्यात आला जुन्या वादातून खून करण्यात आला होता. खून प्रकरणात मयताच्या भाऊ सोन सपकाळे याच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, सोनू सपकाळे हा २३ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास लेंडी नाल्याजवळी पुलावरून दुचाकीने जात होता. त्यावेळी विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून तीन जण आले. त्यांनी सोनू याला अडवून भावाच्या खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नको असे म्हणत मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोनू याच्या फिर्यादीवरून अज्ञात तीन व्यक्तींविरुद्ध शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.