जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एका कंपनीतील मजूर दुसऱ्या कंपनीत पळविण्याच्या कारणावरुन तरूणास मारहाण झाल्याची घटना जळगाव शहरातील एमआयडीसीमधील जी सेक्टर जवळ घडली. या प्रकरणी मंगळवार १२ एप्रिल रोजी एका जणाविरुध्द एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील अयोध्यानगर येथील अरुण लक्ष्मण काकडे यांचा भाऊ विकास काकडे यांची एमआयडीसीमध्ये कंपनी आहे. दिलशान आलम रा.रचना कॉलनी हा काकडे यांच्या कंपनीतील मजूर दुसरीकडे घेऊन जात असल्याची माहिती अरूण काकडे यांना मिळाली. ११ एप्रिल रोजी अरुण काकडे यांनी एमआयडीसी जी सेक्टरजवळ दिलशान आलम याला याबाबतचा जाब विचारला त्यावर दिलशान आलम याने अरूण काकडे यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. अरुण काकडे यांचा भाऊ विकास हा समजविण्यास आला असता त्यालाही दिलशान याने शिवीगाळ केली. अशा अरूण काकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिलशान आलम याच्याविरोधात मंगळवार १२ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहेत.