कौटुंबिक कारणावरुन तरुणाला मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील राजीव गांधीनगरमध्ये कौटुंबिक वादातून एका तरुणाला भावासह वहिणीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, राजीव गांधी नगरात शेखर रघुनाथ ससाणे वय ३४ वास्तव्यास असून ते पेंटरकाम करुन आपला उदरनिर्वाह भागवितात. याच परिसरात त्यांचा भाऊ त्यांचा भाऊ राजेंद्र रघुनाथ ससाने हा सुध्दा कुटुंबासह वास्तव्यास आहे. सोमवार, ९ मे रोजी राजेंद्र ससाने व त्यांची पत्नी गिता ससाने या दोघांनी कौटुंबिक कारणावरुन शेखर ससाने यास चापटाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत राजेंद्र याने शेखर याला रॉड मारला. यात शेखर यास दुखापत झाली आहे.

याप्रकरणी शेखर ससाने याने दिलेल्या तक्रारीवरुन त्याचा भाऊ राजेंद्र व वहिनी गीता ससाने या दोघांविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाठक करीत आहे.

 

Protected Content