जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरटीओ कार्यालयाच्या आवारात खासगी वाहन नेण्यास बंदी असतांना एका तरूणांना आज मंगळवारी चारचाकी वाहन आत नेली. या कारणामुळे उपप्रादेशिक विभागाचे अधिकारी शाम लोही यांनी मारहाण केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, सय्यद इम्रान सय्यद आसीफ (वय २२, रा.शनिपेठ) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज मंगळवारी १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता ही घटना घडली. इम्रान यांचे मोटार ड्रायव्हींग स्कुल आहे. कामाच्या निमित्ताने तो थेट चारचाकी घेऊन आरटीओ कार्यालयाच्या आवारात गेला. यामुळे आरटीओ अधिकारी लोही यांनी त्याला मारहाण करुन शिवीगाळ केली. या घटनेनंतर इम्रान याने रामानंदनगर पोलिस ठाण्यात लोही यांच्याविरुद्ध तक्रार अर्ज दिली आहे. लोही यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्याने केली आहे.