Home क्राईम गॅरेजच्या भागीदारीच्या मतभेदावरुन तरुणास पाच जणांकडून लोखंडी पाईपने मारहाण

गॅरेजच्या भागीदारीच्या मतभेदावरुन तरुणास पाच जणांकडून लोखंडी पाईपने मारहाण


जळगाव प्रतिनिधी । गिर्‍हाईकाची गाडी दुरूस्तीसाठी गॅरेजवर का लावली या कारणावरुन तरुणाला चौघांनी मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी की, तांबापुरा येथील वसीम शकील पटेल वय 32 व  शेख तौसिफ शेख अलीमुद्दीन वय 23  या दोघांमध्ये जळगाव शहरातील एमआयडीसीतील सेवा मोटर्स गॅरेज मध्ये भागीदार आहे. या भागीदारीवरुन दोघांमध्ये मतभेद आहेत. याच कारणावरुन 7 जुलै रोजी रात्री आठ वाजता अजिंठा लॉन्स परिसरातील सेवा मोटर्स गॅरेजवर तौसिफ अलमोद्दीन शेख याच्यासह पाच जणांनी वसीम पटेल यास शिवीगाळ करत लोखंडी  व प्लास्टिक पाईपने मारहाण मारहाण केली. तुम्ही जर आमच्या नांदी लागले तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. वसीम पटेल याच्या तक्रारीवरुन गुरुवार 8 जुलै रोजी दुपारी दीड वाजता तौसिफ अलमोद्दीन शेख, शोएब शेख, जावेद शेख, जमीर शेख व आशिफ शेख सर्व रा. रजा कॉलनी शेरा चौक जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहेत.


Previous articleमोदींनी नव्या मंत्र्यांना सांगितली ‘काम की बात’
Next articleपाउस आला !!
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound