पिस्तुल विक्रीच्या प्रयत्नात असणार्‍या चोपड्यातील तरूणाला अटक

चोपडा प्रतिनिधी । येथील रहिवासी असणारा तरूण पिस्तुल विक्रीच्या प्रयत्नात असतांना त्याला पुणे येथील खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.

चोपडा येथून एक तरुण पिस्तूल विक्रीसाठी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आलेला असल्याची गुप्त माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस अमंलदार सचिन अहिवळे यांना समजली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून भूषण महेश मराठे (वय, २३, रा. चोपडा) यास ताब्यात घेत त्याच्या कब्जातून तिन पिस्टल व ६ जिंवत काडतुसे हस्तगत करण्यात आली.

दरम्यान, त्याच्याकडून पिस्तुल खरेदी करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या राहुल चंद्रकांत पवार (२३), नसरापूर, भोर, तौफिक गुलाब शेख (२५), शिवाजीनगर आणि राम गोरोबा जाधव (२५), दांडेकर पूल, पुणे यांना देखील अटक करण्यात आली आहे. या चौघांकडून आठ देशी बनावटीचे पिस्तूल तसेच १५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Protected Content