चाळीसगाव (प्रतिनिधी) किराणा दुकानात वस्तु खरेदी करण्यास आलेल्या १२ वर्षीय मुलीस अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केल्याची घटना दि ९ रोजी शहरातील आदीत्य नगरात रात्री ८-३० वाजेच्या सुमारास घडली आहे. यासंदर्भात चाळीसगाव शहर पोलीसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी शहरातील आदीत्य नगरात आरोपी नितीन ईश्वर ठाकरे याचे मनुमाता नावाचे किराणा दुकान आहे. पिडीत १२ वर्षीय मुलगी दि ९ रोजी रात्री ८-३० वाजेच्या सुमारास किराणा सामान घेण्यासाठी दुकानात आली होती. त्यावेळी आरोपीने अश्लील कृत्य करु, असे बोलुन तिला दुकानात ओढुन तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. सदर प्रकारामुळे मुलगी घाबरुन पळुन गेली व झालेला प्रकार घरी सांगितला. पिडीत मुलीच्या आईने पोलीस स्टेशनला आरोपी विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी तत्काळ आरोपी नितीन ईश्वर ठाकरे (४०) याच्याविरुद्ध कलम ३५४ अ, बालकांचे लैंगीक अपराधांपासुन संरक्षण अधिनीयम २०१२ चे कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महावीर जाधव करीत आहेत.