मद्यधुंद तरुणांकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

2rapecase 56 1

 

लातूर (वृत्तसंस्था) मंगळवारी रात्री चार तरुणांनी ऑटोरिक्षातून घराकडे जाणाऱ्या एका सोळा वर्षे वयाच्या मुलीला रिक्षाबाहेर ओढून तिचा विनयभंग केला. धक्कादायक म्हणजे तरुणांच्या दहशतीमुळे कुणीही त्या मुलीला वाचवण्यासाठी पुढे आले नाही.

 

मंगळवारी रात्री गजबजलेली बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईत एकट्याने प्रवास करणाऱ्या सोळा वर्षाच्या मुलीला रिक्षातून खाली ओढून तिचा विनयभंग करण्यात आला. जेथे दररोज पोलिस व्हॅन थांबलेली असते तेथेच ही घटना घडली. मुलीने आरडाओरड करून आपली सुटका करून घेतली. दरम्यान, माजी खासदार सुनील गायकवाड यांनी या प्रकाराची माहिती फेसबुकवर पोस्ट करून सर्वांना दिली. त्यानंतर या प्रकाराची पोलिस अधीक्षक राजेंद्र माने, अपर पोलिस अधीक्षक हिंम्मत जाधव, उपाधीक्षक सचिन सांगळे यांनी गंभीर दखल घेत पोलिस पथके तपासासाठी पाठवली आहेत.

Protected Content