Home क्राईम भरधाव दुचाकी भिंतीवर आदळल्याने दुचाकीस्वार तरूण ठार; दुसरा जखमी !

भरधाव दुचाकी भिंतीवर आदळल्याने दुचाकीस्वार तरूण ठार; दुसरा जखमी !


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव वेगाने दुचाकी चालवणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना यावल शहरात घडली आहे. यावल ते बोरावले रस्त्यावर एका खोलीच्या भिंतीला दुचाकीने जोरात धडक दिल्याने दुचाकी चालक नितीन राजू भोई याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नितीन राजू भोई (वय ३९, रा. पिंप्री, ता. यावल) असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन राजू भोई हा १६ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास आपल्या दुचाकीने (एमएच १९ डब्ल्यू ३२७१) यावल-बोरावले रोडवरून जात होता. यावेळी त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या शब्बीर शेख यांच्या शेतातील एका खोलीच्या भिंतीवर जाऊन जोरात आदळली. भीषण अपघातात दुचाकीस्वार नितीन भोई हा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. तर त्याच्या सोबत असलेला राजू सपकाळे हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ निलेश चौधरी हे करीत आहे.


Protected Content

Play sound