तुम्ही २५ वर्षे माजी मंत्रीच राहणार ! : राऊतांचा टोला

मुंबई | आपल्याला माजी मंत्री म्हणू नका असे वक्तव्य करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना तुम्ही २५ वर्षे माजी मंत्री राहणार असे सुनावले आहे.

मला माजी मंत्री म्हणू नका, आगामी दोन तीन दिवसांत कळेल असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात खळबळ उडवून दिली. या संजय राऊत आज चेंबूरमध्ये कार्यक्रमात बोलतांना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले. त्यांनी यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्याचा राऊतांनी समाचार घेतला. मला माजी मंत्री म्हणू नका, दोन ते तीन दिवसांत कळेलच असे चंद्रकांत पाटील पुण्यात बोलताना म्हणाले होते. त्यानंतर एक वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या. चंद्रकांत पाटलांच्या याच वक्तव्याबाबत बोलताना मी स्वत: पाटलांना फोन करुन पुढचे पंचवीस वर्षे तुम्ही माजी मंत्रीच असाल असे चंद्रकांत पाटलांना सांगितले, असे राऊत म्हणाले. तसेच पुढे बोलताना आम्हाला कुणाच्याही कुबड्यांची गरज नाही. स्वबळावर सत्ता हवी तर शिवसेनेला १५० जागा हव्यात, असेही राऊत म्हणाले.

आम्ही कुणाच्या पाठीत वार करत नाही, असं राऊत म्हणाले. तसेच शिवसेना असंख्य वार आणि घाव घेऊन इथपर्यंत आली आहे. ही शिवसेना त्यागातून संघर्षातून समोर आलेली आहे. जी आंदोलनं आपण केली त्याच पुण्याईवर आज शिवसेना उभी आहे, याची आठवणही राऊत यांनी कार्यकर्त्यांना करुन दिली.

 

Protected Content