Home Cities जळगाव योगेश्वर पाटील यांना ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’ जाहीर

योगेश्वर पाटील यांना ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’ जाहीर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जयपूर, राजस्थान येथील भव्या फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड’ व ‘आंतरराष्ट्रीय मैत्री संमेलन’ या प्रतिष्ठित सोहळ्यात कबचौउमवि, जळगाव येथील राज्यशास्त्र विभागाचे संशोधक विद्यार्थी योगेश्वर सुभाष पाटील यांची ‘ग्लोबल डायमंड आयकॉन अवॉर्ड – २०२६’ साठी निवड करण्यात आली आहे.

फाउंडेशनच्या संचालिका डॉ. निशा माथुर व संचालक शैलेन्द्र माथुर यांनी ही माहिती दिली. हा भव्य सोहळा ५ एप्रिल रोजी जयपूर, राजस्थान येथे आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक प्रतिष्ठित आयएएस आणि आयपीएस अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

योगेश्वर सुभाष पाटील यांनी संशोधन तसेच शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन त्यांची या प्रतिष्ठित सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांनी लोकप्रशासन या विषयातील नेट-जेआरएफ परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तसेच त्यांनी राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि आंतरराष्ट्रीय संबंध या तिन्ही विषयांमध्ये नेट परीक्षेत घवघवित यश मिळवले आहे.

त्यांच्या संशोधन कार्यामुळे शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडून येत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शैक्षणिक क्षेत्रासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


Protected Content

Play sound