जळगाव प्रतिनिधी । येथील रंगकर्मी आणि मुलजी जेठा महाविद्यालयाच्या जनसंवाद व पत्रकारिता विभागातील सहाय्य्क प्राध्यापक योगेश पाटील यांची ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या ‘टीआयई’ या अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
‘एनएसडी’च्या या अभ्यासक्रमासाठी भारतभरातून २० विद्यार्थ्यांची निवड झाली असून महाराष्ट्रातून योगेश पाटील हे एकमेव आहेत. गुवाहाटी या ठिकाणी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेत ही निवड करण्यात आली. योगेश पाटील यांनी अनेक स्पर्धांमध्ये पारितोषिके मिळवली असून मु. पो. कळमसरा, मांज्या, कितने राम, यासह अनेक एकांकिका तर बादल सरकार यांचे सारी रात, पगला घोडा, शंकर शेष यांचे रक्तबीज यासारखी अनेक नाटके त्यांनी दिग्दर्शित केली आहेत. यासोबतच जळगाव शहरातील अनेक शाळांची बालनाट्ये दिग्दर्शित करून विद्यार्थ्याना रंगभूमीशी जोडण्याचं काम केलय. सध्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या परिवर्तन निर्मित नली एकलनाट्याचे दिग्दर्शन करून एक प्रयोगशील दिग्दर्शक अशी स्वतंत्र ओळख निर्माण केलीय. नली नाटकाचे प्रयोग सुरु असून जेष्ठ रंगकर्मींकडून त्याच कौतुकही करण्यात आलंय. योगेशच्या या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंद होत आहे.