पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील संभाजी सेनेच्या तालुका युवक अध्यक्षपदी योगेश ज्ञानेश्वर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिवाजी शिरसाठ यांनी योगेश ज्ञानेश्वर पाटील यांचे समाजकार्य व जनसंपर्क तसेच सामाजिक संबंध पाहता संभाजी सेनेत कार्यकर्ता म्हणुन समाधानकारक कार्य करीत असल्याने तसेच आपण संघटना बांधणी संदर्भात संघटनेच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतलेली असून संभाजी सेनेच्या वरीष्ठांकडे आपण आपली संभाजी सेनेच्या माध्यमातून समाजसेवा करण्याची ईच्छा व्यक्त केलेली असल्यामुळे आपली संभाजी सेनेच्या पारोळा तालुका युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. तरी आपण या पदाच्या माध्यमातून संभाजी सेनेचे सामाजिक आणि विधायक कार्य करावे, तसेच संघटनेस व समाजास घातक असे कार्य न करता संघटनेचे आदेश व नियमानुसार योग्य ते कार्य करावे. आपली निवड झाल्याबद्दल आपणास प्रदेश कार्यकारीणीच्या शुभेच्छा देऊन लक्ष्मण शिवाजी शिरसाठ यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.