Home Cities अमळनेर कळमसरे येथील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी योगेंद्रसिंग पाटील

कळमसरे येथील तंटामुक्त समिती अध्यक्षपदी योगेंद्रसिंग पाटील

0
25

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील प्रगतीशील शेतकरी योगेंद्रसिंग पाटील यांची नुकतीच महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

योगेंद्रसिंग पाटील हे गावात सामाजिक आणि धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सक्रिय सहभाग राहतो. राजकीय वर्तुळात देखील त्यांचे स्थान असल्याने योग्य व्यक्ती म्हणून सर्वानुमते त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या या नियुक्ती बद्दल आमदार अनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील ,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,  स्मिता वाघ, नगराध्यक्षा जिजामाता पुष्पलता पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, काँग्रेस किसान सेल जिल्हाअद्यक्ष सुरेश पाटील, सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र राजपूत, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह  सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

 


Protected Content

Play sound