Home करियर वि.स्त. योग चॅम्पियनशिप स्पर्धेत तन्मय प्रथम

वि.स्त. योग चॅम्पियनशिप स्पर्धेत तन्मय प्रथम

0
40

tanmay ..m.j.clg

जळगाव प्रतिनिधी । यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा आयोजित विद्यापीठ स्तरीय योग चॅम्पियनशिप स्पर्धा (दि. 20 जुन) रोजी घेण्यात आली. त्यात मू.जे. महाविद्यालयातील सोहम डिपार्टमेंटचा तन्मय गायकवाड याने प्रथम पारितोषिक प्राप्त केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विद्यापीठ स्तरीय योग चॅम्पियनशिप (दि. 20 जुन) रोजी स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेचा निकाल (दि. 21 जुन) रोजी जाहीर करण्यात असून या स्पर्धेमध्ये मुलांचा गटातून एम.जे. महाविद्यालयातील सोहम योग निसर्गोपचार विभागामधील तन्मय गायकवाड याने प्रथम क्रमांक मिळविण्याच्या मान प्राप्त केला आहे. तन्मय यावेळी म्हणाला की, मला योग्य प्रशिक्षण मिळाल्यामुळे प्रथम बक्षीस मिळवू शकलो आहे. तन्मयने त्याच्या यशाचे श्रेय योग प्रशिक्षक प्रा. पंकज खाजबागे यांना दिले असून त्याने मनपूर्वक आभार मानले आहे. यावेळी डॉ.जयदीप निकम (डायरेक्टर, हेल्थ सायन्स, य.च.मुक्त विद्यापीठ) डॉ.अभय पाटील व डॉ.विजया पाटील (शिक्षण शास्त्र विभाग, विदयार्थी कल्याण समिती) आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound