कासोदा ता.एरंडोल (वार्ताहर) येथील साधना माध्यमिक विद्यालय व क. न.मंत्री विद्यालयात गतवर्षा प्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी साधना शाळेचे माजी प्रा. सी.जी.पाटील हे योगाचार्य योग गुरू म्हणुन उपस्थित होते. तर गावातील जेष्ठ पत्रकार प्रमोद पाटील, वनकोठे बांभोरीचे लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील, शाळेचे प्रा. जि. के.सावंत अशा सर्वांना आज २१जून आंतराष्ट्रीय योग दिवस योगा करून साजरा केला. या वेळी योगगुरु सी. जी.पाटील यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना सांगितले की, योगामुळे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य लाभते. ग्रामीण भागातही योगाचे महत्त्व वाढत आहे. जनतेमध्ये योगाची क्रेझ वाढताना दिसत आहे. शालेय जीवनापासून योगाचे महत्त्व रुजविण्याची गरज आहे. धावपळीच्या युगात योगाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. भारताच्या योग परंपरेला जगातील शेकडो देशात मानाचे स्थान दिले जात आहे. थोरात सर,अहिरे सर, उपरे सर,के. के.पवार सर पी.ल.मोरे सर. सौ.पाटील मॅडम, साळुंखे मॅडम, ढोले मॅडम, पवार मॅडम, भामरे मॅडम आदी शिक्षक, शिक्षिका,शिक्षेतर कर्मचारी शाळेचे माजी विद्यार्थी, ओम साई राम पोलीस गृपचे विद्यार्थी उपस्थित होते.