जळगाव प्रतिनिधी । येथील नूतन मराठा महाविद्यालयात आज सकाळी जागतिक योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नूतन महाविद्यालयात सकाळी साडेसहा वाजता योग दिवसाच्या कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रा. बी. डी. सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कॉलेज चे प्राचार्य डॉ एल. पी. देशमुख, उपप्राचार्य प्रा आर. बी. देशमुख, प्रा एन. जे. पाटील, प्रा डी. टी. बागुल, प्रा डी. आर. चव्हाण, प्रा एस. ई. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक उपस्थित होते.