Home Cities मुक्ताईनगर होय ईडीची नोटीस मिळाली ! : खडसेंनी दिला दुजोरा

होय ईडीची नोटीस मिळाली ! : खडसेंनी दिला दुजोरा

0
21


मुंबई प्रतिनिधी । आपल्याला ईडीने पाठविलेली नोटीस मिळाली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.

काल सायंकाळी उशीरा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने नोटीस बजावल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ईडीने त्यांना चौकशीसाठी ३० डिसेंबर रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देतांना एकनाथराव खडसे यांनी आपल्याला ही नोटीस मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले होते. आपल्याला जेव्हा नोटीस मिळेल तेव्हाच आपण या प्रकरणी बोलू असे ते म्हणाले होते. या पार्श्‍वभूमिवर, आज दुपारी एकनाथराव खडसे यांनी आपल्याला ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आपल्याला मुद्दाम नोटीस देण्यात आली असून आपण या चौकशीला सामोरे जाऊ. ही नोटीस मिळाल्यानंतर आपल्याला राज्यभरातून फोन येत असल्याची माहिती सुध्दा त्यांनी दिली.


Protected Content

Play sound