यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परिसराला हादरवून सोडणार्या किनगाव येथील वृध्दाच्या खून प्रकरणातील आरोपी महिला आणि तिच्या साथीदाराची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
संपुर्ण तालुक्याला हादरून सोडणारे किनगाव येथील ट्रकचालका झालेल्या निर्युण खुनातील संशयीत दोघ आरोपींना न्यायालयाने सात दिवस पोतीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावल तालुक्यातीत किनगाव बु॥ येथील वयोवृद्ध ट्रकचालक भिमराव सोनवणे यांचा दिनांक २४ मार्च च्या रात्री किनगाव ते चुंचाळे गावाकडे जाणार्या रस्त्यावरील पुलावर झालेल्या खुनाबद्दल पोलीसांनी गावातील ग्राम पंचायतच्या वतीने विविध ठिकाणी लावण्यात आलेले सिसिटीव्ही ( तिसरा डोळा ) च्या मदतीने महत्वाची कामगीरी करीत खुनाचे आरोपींना अटक करण्यात मदत मिळाली.
मयत भिमराव सोनवणे यांची सुन मिना सोनवणे हिने जावेद शाह जयअली शाह याच्या मदतीने सासर्याचा खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी दोघ संशयीत आरोपींना यावल न्यायालयात हजर केले असता , न्या.एस .एम . बनचरे यांनी दोघ आरोपींना ३१ मार्चपर्यंत सात दिवसासाठी पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान पोलीस कोठडीतील तपासातून या प्रकरणातील अजून काही आयाम समोर येण्याची शक्यता आहे.