Home Cities यावल यावलमध्ये भाजपला धक्का : विनोदकुमार पाटील यांचा विजय

यावलमध्ये भाजपला धक्का : विनोदकुमार पाटील यांचा विजय

0
130

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यावल विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून विद्यमान संचालक गणेश नेहेते यांना पराभूत करून विनोदकुमार पंडित पाटील यांनी आज विजय मिळविला आहे.

जळगाव मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यावल विविध कार्यकारी सहकारी संस्था मतदारसंघातून तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान संचालक गणेश नेहेते यांचा सामना सहकार पॅनलचे विनोदकुमार पंडित पाटील यांच्याशी झाला. यात गणेश नेहते हे लागोपाठ दुसर्‍यांदा विजय संपादन करून जिल्हा बँक संचालक बनतील असे संकेत होते. मात्र निकालातून वेगळेच दिसून आले.

आज झालेल्या मतमोजणीत विनोद पाटील यांना २६ तर गणेश नेहेते यांना २२ मते मिळाली. यामुळे चार मतांनी विनोदकुमार पाटील यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेत संचालक म्हणून एंट्री केली आहे.


Protected Content

Play sound