यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील आयशानगर भागात टिपू सुलतान यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.
यावल शहरातील विस्तारित वसाहती मधील आयशानगर क्षेत्रातील युवकांनी स्थापन केलेल्या टिपु सुलतान सेनाच्या वतीने शेरे म्हैसूर टिपु सुलतान यांची जयंती मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थितांच्या वतीने टिपु सुलतानच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करून सामुहीक प्रार्थना ( दुआ ) करून प्रसाद वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या जीवन कार्याबाबत माहिती दिली.
टिपु सुलतान यांच्या शासन काळात १५३ मंदीरांचे निर्माण करण्यात आले होते , टिपु सुलतान यांचे सेनेत व दरबारी तसेच रक्षक म्हणुन अनेक हिन्दु बांधवांचा समावेश होता, टिपु सुलतान यांनी कुरान सोबत गीताचा अभ्यास केला होता, ब्रिटीशांशी जिवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी लढा दिला त्यांची ओळख मिसाइल मैन म्हणुन देखील होती असे मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशफाक शाह ( अध्यक्ष टिपु सुलतान सेना ); समीर पटेल, कैफ शेख़, अहेतेशम शैख़, शाहिद पटेल, हाफिज खान, शोएब पटेल, शकील शैख़, जुनेद खान, तौफीक शैख़, मुजीब शैख़, नईम शैख़ व आयशा नगर परिसरातील युवकांनी परिश्रम घेतले .