Home Uncategorized रस्त्यावरून चालणार्‍या व्यापार्‍याचा लांबविला मोबाईल

रस्त्यावरून चालणार्‍या व्यापार्‍याचा लांबविला मोबाईल

0
26

यावल प्रतिनिधी | येथील सराफा बाजारातील दरोड्यातील आरोपी अटकेत आले नसतांना आता दूध डेअरी चालकाचा मोबाईल भर रस्त्यावरून लांबविल्याचा प्रकार घडला असून हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी दिनांक ११ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बुर्‍हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील पेट्रोल पंपा समोरील आठवडे बाजार जवळ असलेल्या शबनम दुध डेअरीचे चालक शेख दानिश शेख युसूफ हे रस्त्याने जात होते. एवढ्यात बाजुने मोटरसायकल वरून येणार्‍या अज्ञात चोरट्यांनी हातातुन२५ हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल घेवुन पोबारा केला.

या बाबत शेख दानिश शेख युसुफ यांनी यावल पोलीसात मोबाईल चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली असुन पेट्रोल पंपावरील लावण्यात आलेल्या सिसिटीव्हीच्या कॅमेर्‍यात मोबाइल चोरटे कैद झाले आहे. दरम्यान यावल शहरात व परिसरात चोरट्यांकडुन काही ठिकाणी घरात घुसुन चोरीचा प्रयत्न केल्याची चर्चा होत आहे. मात्र याची पोलीसात अधिकृतरित्या कुठही नोंद नसल्याची माहीती मिळाली आहे. पोलीस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या पंपावर समोर झालेल्या अशा प्रकारच्या लागोपाठ होणार्‍या रस्तालुट व दरोडयाची घटना व मग चोरांकडुन मोबाइल लांबविण्याच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरीकांपासुन व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे.


Protected Content

Play sound