Home क्राईम यावल तालुक्यात तरुणाचा खून : परिसरात खळबळ

यावल तालुक्यात तरुणाचा खून : परिसरात खळबळ


यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील विरावली दहिगाव रोडवर या तरुणाची हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा

तालुक्यातील विरावली दहिगाव रोडवर एक धक्कादायक घटना घडली असून, दोन जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केल्याची घटना घडली असुन हत्या करणारे हत्या करून मोटरसायकलसह यावलच्या पोलीस स्टेशन मध्ये स्वतः हजर झाले आहे. मयत तरुणाचे नाव इम्रान युनुस पटेल (वय २१ वर्ष असुन, राहणार सुरेश आबा नगर दहिगाव तालुका यावल ) असून हत्या झाल्याचे ठिकाण विरावली दहिगाव रोडवरील खिरवा रस्त्यावर झाली असल्याचे वृत्त आहे . इम्रान पटेल हा खून झालेला तरूण मुळ हनुमंतखेडा तालुका धरणगाव येथील राहणारा असुन तो दहिगाव येथे आपल्या मामाच्या गावी राहात होता.

दरम्यान, हत्या करणारे दोघे संशयित आरोपी तरुणांची नावे ज्ञानेश्वर गजानन पाटील (वय १९) व गजानन रविद्र कोळी (वय १९) असून हे दोघे तरुण यावल पोलीस स्टेशनला दुचाकी द्वारे हजर झाले. पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे घटनास्थळी पथकासह दाखल झाले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.


Protected Content

Play sound