यावल प्रतिनिधी । तालुक्यात दोन दुर्घटनांमध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले असून न्हावी येथील युवतीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातील बुरुज चौकात सायंकाळच्या सुमारास भुसावळकडुन चोपडयाकडे जाणार्या ट्रक क्रमांक आर.जे. १७जीए६३५९या गाडीने झालेल्या अपघातात यावल येथील राहणारे मधुकर झिपरू तायडे ( वय ५८ ) यांचा अपघात होवुन त्यात ते गंभीर जख्मी झाले आहेत. तर दुसर्या घटनेत शरद चांगो गजरे (वय ३२ वर्ष रा. चुंचाळे ) हे दुपारच्या सुमारास आपल्या घराच्या छतावर पत्रे ठोकण्याचे काम करीत असतांनाखाली कोसळल्याने गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, तालुक्यातील न्हावी येथील राहणारी १९ वर्षीय तरूणी हिना नबाब तडवी हिने आपल्या राहत्या घरात दुपारी ४ वाजेच्या सुमारास छताला गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोघ अपघातातील जख्मी यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात डॉ. फिरोज एम. तडवी व डॉ एन. डी. महाजन यांनी उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर गळफास घेवुन आत्महत्या केलेल्या हिना तडवी हिचे शवविच्छेदन देखील यावलच्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. ट्रक अपघातातील चालक ईश्वरलाल सुतार (राहणार मंदसोर मध्यप्रदेश) व क्लिनर खालीद यांना ट्रकसह पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.