यावल ग्रामीण रूग्णालयाचे सीसीटिव्ही कॅमेरे नादुरूस्त

 

img329 1492421703

यावल प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आली आहे. रूग्णालयात लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपासुन नादुरूस्त आहे तर शनीवारी रात्री एका परिचारिकेचा मोबाईलसह रोकड असलेले पर्स अज्ञात चोरट्यांने लांबवली, हाणामारी झालेल्या रूग्णांवर उपचार करतांना ही घटना घडली असुन जर सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असते तर चोरटा पकडला गेला असता.

वैद्यकिय अधिकारी नसल्याने उध्दभवणाऱ्या रोषात येथे कॅमेरे दुरूस्त राहणे खुपचं महत्वाचे असुन रूग्णालयाच्या भोंगळ कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे. शनिवारी किनगावात दोन गटात हाणामारी झाली होती व त्या घटनेतील जखमींना सायंकाळी येथील ग्रामिण रूग्णालयात उपचाराकरीता दाखल तेव्हा रात्री 8 वाजेच्या सुमारास या जखमींना पाहण्याकरीता रूग्णालयात गर्दी झाली होती व जखमींना जळगाव येथे हलवण्याची तयारी रूग्णालयातील आरोग्यसेवक व परिचारीका करीत होत्या. दरम्यान रात्रीच्या शिप्टकरीता आलेल्या एका परिचारीकेने परिचारीका कक्षात मोबाईल व पर्स ठेवल्यानंतर तातडीने रूग्णावर उपचार करून जळगाव हलवण्याची तयारीत त्या लागल्या. हिचे संधी साधत अज्ञात चोरट्यांनी परिचारीका कक्षात जावुन पर्स व मोबाईल लांबवला. रोख रक्कम सुमारे 5 व 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल आणी पॅनकार्ड, एटीएमकार्ड होते. याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिस निरिक्षक डी.के. परदेशी स्वत:हा रूग्णालयात येवुन चौकशी केली व सीसीटीव्ही पुटेज पाहणी करीता गेले असता. सीसीटीव्ही यंत्रणा गेल्या काही महिन्यापासून नादुरूस्त असल्याचे समोर आले. तेव्हा यापुर्वी देखील रूग्णालयात वादाचे तसचे चोरीचा प्रकार घडला असुन नादुरूस्त सीसीटीव्ही यंत्रणेमुळे चोरट्यांना चांगलेच फावत आहे. तर आधीच येथे वैद्यकिय अधिकारी नाही वरून लावण्यात आलेले सीसीटिव्ही कॅमेरे नादुरूस्त असल्याने कर्मचारींचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Add Comment

Protected Content