यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रावर राष्ट्रीय रोटा व्हायसर लसीकरण जनजागृती मोहीम कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी परीसरातील प्रसुती झालेल्या महीला आपल्या नवजात बाळांना घेवुन या मोठ्या संख्येत सहभागी झाल्यात.
याप्रसंगी या रोटा व्हायरस लसीकरण जनजागृती मोहीमेस सहभागी झालेल्या प्रसुती महीलांना व आशा वर्कर यांना मार्गदर्शन करतांना हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केन्द्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फिरोज एम. तडवी यांनी सांगीतले की, रोटा व्हायरस लस ही भारतासह जगातील ९३ देशातील राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमामध्ये वापरली जाते. आपल्या देशात ही रोटा व्हायरस लस खासगी डॉक्टरव्दारे दिली जात असल्याची माहिती दिली, रोटा व्हायरस लसीकरण हे रोटा व्हायरस अतिसार रोखण्यासाठी एकमेव प्रभावी पर्याय आहे.व्हायरस अतिसारामुळे रुग्णालयामध्ये भरती होणे आणी त्याच्यामुळे होणाऱ्या मृत्युंची संख्या कमी करण्यासाठी परिणामकारक असल्याचे डॉ. फिरोज एम. तडवी यांनी सांगीतले. या कार्यक्रमाप्रसंगी सुनंदा सोनवणे, के.टी. पाटील, अशोक तायडे, कामीनी किणगे, प्राथमिक केंद्राचे मुकेश सुपे, जि.जि. डोळे, पत्रकार हर्षल आंबेकर व आदी कर्मचारी परिसरातील आशा वर्कर उपस्थित होते.