फैजपूर प्रतिनिधी । कृषी वीजबिल माफीसाठी रावेर -यावल तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधवांनी फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर आज सकाळी भव्य मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदनही दिले.
गेल्या पाच-सहा वर्षापासून पावसाचे प्रमाण अत्यल्प होत असल्यामुळे यावल आणि रावेर तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. संपूर्ण देशात भूजल पातळीही सर्वात वेगाने यावर रावेर तालुक्यात होतो. खोलवर जात आहे. शासनाने डार्क झोन म्हणून घोषित केलेला आहे. त्यामुळे मागील तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर सर्व प्रकारच्या पिकांचे नुकसान झालेले आहे. यामुळे शेतकरी वर्ग कर्जबाजारी झालेला आहे. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. यावल रावेर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांची विज बिल थकलेली असून शेतकरी बांधव आर्थिक नुकसान यामुळे विज बिल भरू शकत नाही, अशी विदारक परिस्थिती ओढवलेली आहे.
मागील पाच वर्षापासून विहिरीचे पाणी कमी झाले असून सुद्धा वीज बिले अवास्तव पण वीज वितरण कंपनीकडून दिलेली आहेत. शेतकरी अशा बिकट परिस्थितीत वीज बिले भरणे कसे भरू शकणार आहे, तरी अशा या आर्थिक नियोजनाच्या संकटात अडकलेल्या आम्हाला शेतकरी बांधवांचे विज बिल संपूर्णपणे माफ करून नव्याने उभारणीत हातभार लावावा. आज सकाळी 11 वाजता रावेर- यावल तालुक्यातील शेतकरी बांधवांनी भव्य मूक मोर्चा फैजपूर प्रांत कार्यालयावर आणला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. याप्रसंगी नितीन चौधरी नारायण चौधरी यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना समयोचित मार्गदर्शन मांडले. प्रांताधिकार्यांना निवेदन नायब तहसीलदार महेश साळुंखे व रशिद तडवी यांना मागणीचे निवेदन दिले.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी नितीन चौधरी, जिल्हा दूध संचालक हेमराज चौधरी, कृषिभूषण नारायण चौधरी, नितीन राणे, कृबास उपसभापती राकेश फेगडे, महाजन, उमेश पाटील, अशोक फालक, जितेंद्र भारंबे, किशोर कोल्हे, प्रभाकर चौधरी, निलेश पाटील, हर्षद महाजन, सोपान पाटील, मनोज वायकोळे, आनंदा फेगडे यासह फैजपूर व परिसरातील तसेच रावेर यावल तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.