यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी येथे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्याकडुन धार्मिक जातीय सलोखा राखण्यासाठी केलेत राष्ट्रीय एकात्मतेचे अभिनव प्रयोग राबविण्यात आला.
यावल पोलीस प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या संकल्पनेतून व लोकांमध्ये धार्मिक एकतेबाबत जनजागृती व्हावी याकरिता दि.१४ रोजी पोलिस प्रशासनाकडून लोकसहभागातून एका सुंदर प्रयोग राबविला. यात संपूर्ण गावातून पोलिसांनी रूट मार्च काढला. या रूट मार्चचे वैशिटय म्हणजे पोलिस प्रशासनाच्या गाडीवर परमपूज्य साने गुरुजी यांच्या ‘खरा तो एकची धर्म – जगाला प्रेम अर्पावे’ हे गीत वाजविण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी वेगवेगळ्या धार्मिक महामानव व विविध राष्ट्र पुरुषांबद्दल माहित देत धार्मिक एकतेची महती सांगितली. गावाचा धार्मिक एकतेचा सुगंध सर्वत्र देशभर दरवळेल यासाठी सर्व नागरिकांचं एकत्रित गुण्यागोविंदाने राहणं फार गरजेचा असल्याचे त्यांनी पटवून दिले. या रुट मार्चच्या दरम्यान श्री धनवडे यांनी गावातील शाळाकरी मुलांकडून ‘सारे जहासे अच्छा हिंदुस्तान हमारा’ यासारखी काही देशभक्तीपर गीते म्हणून घेतली. तर काही नागरिकांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या संकल्पनेतील या आगळ्यावेगळ्या व धार्मिक एकता जोपासण्याबाबतच्या अभिनव प्रयोगाचे गावात व तालुक्यात सर्वत्र नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात येत आहे .
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1177809262599545/