यावल प्रतिनिधी । यावल पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अरूण धनवडे यांची नियुक्ती करण्यात आली असून नुकताच त्यांनी आपला पदभार स्विकारला आहे.
पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे यांची बदली करण्यात आली असून मुंबई येथील गुन्हे अन्वेषण विभागात सेवा बजावणारे पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांची नियुक्तीचे आदेश पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी आदेश काढले. गेल्या काही दिवसांपासून मावळते पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी सुटी घेतली होती. त्याच्या जागी धनवडे काही दिवस पोलीस निरीक्षक पदाचा पदभार स्विकारला होता. आता ही नियुक्त कायमस्वरूपी करण्यात आली आहे.