यावल प्रतिनिधी । यावल पोलीस स्टेशनच्या आवारात (दि.10) रोजी सकाळी ११ वाजता ग्रामीण पातळीवरील कायदा व सुव्यवस्थेबाबत बैठक घेण्यात आली असून ही बैठक पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली.
शहरी भागापेक्षा गाव पातळीवरील अधिक कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची अतिशय महत्वाची भुमिका असते. ग्रामीण नागरिकांशी शांतता राखण्यासाठी कशा पद्धतीने आपण वागले पाहिजे, याबाबतची विस्तृत माहिती येथील तालुका पोलीस स्टेशनला नुकतेच रूजू झालेल्या पोलीस निरिक्षकांनी घेतलेल्या पोलीस पाटीलांची पहिल्याच बैठकीत तालुक्यातील सर्व पोलीस पाटीलांनी आपली हजेरी लावली. या बैठकीत कायदा सुव्यवस्थेसंदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.
यात पो.नि.धनवडे यांनी पोलीस, पोलीस पाटील आणि नागरिकांमध्ये कायद्याविषयी कशा प्रकारे सु-संगत कशी राखता येईल, यासंदर्भात मार्गदर्शन केली. बैठकीत पोलीस पाटील मनोज देशमुख, रेखा सोनवणे, दिलीप सांळुके, गणेश पाटील, उमेश पाटील, सलीम तडवी, माधुरी राजपुत, किरण कचरे, पंकज बडगुजर, दिपक पाटील, मेहमुद तडवी, कैलास साळंखे, भुषण पाटील आदी पोलीस पाटील यावेळी उपस्थितीत होते.