यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पंचायत समितीत ठेकेदार आणि अधिकार्यांचे संगनमत असून याची चौकशी करण्याची मागणी आदीवासी तडवी, भिल एकता मंचाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एम. बी. तडवी यांनी केली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, यावल तालुक्यात शासनाच्या कोट्यवधी रूपयांच्या निधीतुन पंचायत समितीच्या माध्यमातुन होणार्या विविध विकासकामे ही पद्धतशीरपणे काही ग्रामसेवक आणी अधिकारी संगनमताने आपल्या मर्जीतील तथा कथित ठेकेदारांना दिले जात आहेत. यामुळे सुशिक्षीत बेरोजगार अभियंत्यामध्ये यावल पंचायत समितीच्या या भोंगळ व भ्रष्टाचाराला खतपाणी देणार्या कारभाराबद्दल मोठया प्रमाणावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात लवकरच आदीवासी तडवी, भिल एकता मंचाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष एम. बी. तडवी यांच्या नेतृत्वाखाली पदधिकारी जिल्हा परिषदचे सिईओ डॉ पंकज आशिया यांची भेट घेणार आहेत.
यावल तालुका हा आदीवासी क्षेत्र म्हणुन ओळखला जातो येथील पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात ८५ गावे येतात या सर्व गावांना नागरीकांच्या अडीअडचणी समस्या व विविध विकासकामे करण्यासाठी शासनस्तरावर कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत आहे . ग्रामपंचायतच्या विकास कामांसाठी मिळालेल्या निधीला संबधीत काही भ्रष्ट वृत्तीचे ग्रामसेवक हे सरपंच यांना विश्वासात न घेता शिताफीने डीएससी डिजीटल कम्प्युटर स्वाक्षरी प्रमाणपत्र च्या नांवाखाली ई – टेंडरचा गैरवापर करून ग्रामपंचायत स्तरावर अनेकांना मुर्ख बनवुन गैर मार्गाने आपले आर्थिक हेतु साध्य करीत असल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यातील हिंगोणा ग्रामपंचायतमध्ये अशाच पध्दतीने डीएससीच्या नांवाखाली आदीवासी महिला सरपंच यांची डिजीटल स्वाक्षरीच्या ई – टेंडर प्रक्रीयेत दिशाभुल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणाची जिल्हा परिषदचे सिईओ डॉ .पंकज आशिया यांनी या गंभीर प्रकरणात विशेष लक्ष केन्द्रीत करून यावल पंचायत समितीच्या डीएससी स्वाक्षरी च्या नांवाखाली होणार्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून कोणकोणते अधिकारी व ग्रामसेवक यात शामील आहे अशा सर्वांची निःपक्ष चौकशी करून कार्यवाही करावी तसे झाल्यास यावल पंचायत समितीत विकास कामांसाठी मिळणार्या निधीचा मोठा घोळ भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता आदीवासी तडवी भिल एकता मंच, या सामाजीक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एम. बी. तडवी यांनी व्यक्त केली आहे.
या सर्व प्रकारांबाबत चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्यात यावी यासाठी आपण जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. पंकज आशिया यांची भेट घेणार असल्याची माहिती एम. बी. तडवी यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना दिली.