यावल प्रतिनिधी । आपल्याकडे शिकणार्या सहा वर्षाच्या विद्यार्थीना विनयभंग करणार्या खासगी क्लास चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत वृत्त असे की, यावल शहरातील आयेशा नगर भागात सईद बेग गुलाब बेग मिर्झा वय ३२ रा. डांगपुरा यावल हा खाजगी शिकवणी घेतो. मंगळवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्ये तो शिकवणी घेतो. त्याच्याकडे शिकवणीला गेलेली सहा वर्षे वयाची बालिका ही वेळ उलटूनही घरी न आल्याने तिच्या आईने तिच्या अल्पवयीन भावास शोध घेण्यासाठी पाठवले.
याप्रसंगी सईद बेग गुलाब बेग मिर्झा हा क्लास चालक त्या मुली सोबत अश्लील चाळे करत असताना दिसून आला. यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी व जमावाने शिक्षकाला चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिसात पोस्को कायदा अन्वय बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूनिता कोळपकर, सहायक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.