यावल प्रतिनिधी । प्रेम संबंधातील वादावरून एका तरूणाचे घर जाळून टाकल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील चुंचाळे येथे घडली असून यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, शरद अशोक पाटील ( रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) हा चुंचाळे येथील आपल्या मूळ घरी विवाहासाठी आला होता. शरदचे गावातीलच मूळ रहिवासी व सध्या रत्नागिरी येथे पोलीस दलात कार्यरत असणार्या तरूणीशी प्रेमसंबंध होते. रविवारी त्यांच्या कुटुंबात विवाह समारंभ सुरू असतांना संबंधीत तरूणी ही तिच्या कुटुंबियांसह मंडपात वाद घालण्यासाठी आली. त्यांना शरदला मारहाण करून त्याच्या घराला आग लावली.
या प्रकरणी शरद पाटील याच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधीत तरूणीसह फिरोज जुम्मा तडवी, अफरोज जुम्मा तडवी, मुमताज जुम्मा तडवी, संजू तडवी व अन्य अशा एकूण सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/240282554352990