यावल प्रतिनिधी । तापी नदीवरील शेळगाव बॅरेजसाठी राज्य सरकारने १४० कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, शेळगाव येथे तापी नदीवर बांधण्यात येणार्या बंधार्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. या अनुषंगाने शेळगाव बॅरेजसाठी निधी द्यावा. सन २०२१-२२च्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी आमदार चौधरींनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन केली होती. त्यास मंत्री पाटील यांनी प्रतिसाद देत प्रकल्पासाठी २०२१-२२ च्या वार्षिक आखणीमध्ये १४० कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद केल्याचे कळवले आहे. या निधीमुळे बॅरेजचे काम पूर्णत्वास होण्यास मदत होईल. पुढील वर्षापासून बॅरेजमध्ये पाणी साठवता येवून हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याची माहिती आमदार शिरीष चौधरी यांनी दिली आहे.