यावल प्रतिनिधी । येथे काँग्रेस आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आघाडीची लोकसभा निवडणुकी संदर्भातील पहीलीच कार्यकर्ता बैठक माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावल येथील खरेदी विक्री शेतकी संघाच्या सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या आघाडीच्या बैठकीत आपले उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना निवडणू आणण्यासाठी यावेळी बैठकीत नियोजन करण्यात आले.
प्रत्येक निवडणुक ही कार्यकर्त्याच्या संघर्षची असते पक्षाच्या पदाधिकाऱ्यानी शेवटच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातुन तळागळातील मतदारा पर्यंत जावुन आपल्या पक्षाची व आघाडीच्या उमेदवाराची भुमिका स्पष्ठ करावी असे कार्यकर्त्यांशी मार्गदर्शन करतांना माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांनी सांगितले, यावेळी काँग्रेसचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान व कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य आणी तालुका अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे, यांनी ही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व सुचना दिल्यात व आपल्या आघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील हे दिनांक २ एप्रील रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असुन अधिका अधिक कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहावे असे आवाहन प्रभाकर अप्पा सोनवणे यांनी केले.आघाडी या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, नाना बोदडे, काँग्रेसचे नगरसेवक असलम शेख नबी, मनोहर सोनवणे, सय्यद युनुस सय्यद युसुफ, समीर शेख बशीर मोमीन, गुलाम रसुल हाजी गु. दस्तगीर, यांच्यासह खरेदी विक्री संघाचे संचालक , तसेच अनिल जंजाळे, हाजी ताहेरशेख चाँद, सतिष पाटील, काँग्रेस कमिटीचे यावल तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फारशाह मुसा शाह, काँग्रेसचे यावल शहराध्यक्ष कदीर खान,, राजु पिंजारी, यांच्यासह अनेक पदाधिकारी मोठया संख्येने या तातडीच्या नियोजन बैठकीला उपस्थित होते.