यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील हिंगोणा येथील नवीन बसस्थानकाच्या कामांना सुरूवात करण्यात आली. गेल्या अनेक महिन्यांपासून गावात नविन बसस्थानक व्हावे अशी नागरीकांसह प्रवाश्यांची मागणी होती.
हिंगोणा येथीलबसस्थानकावर प्रवाशी निवारा नसल्याने होत असलेल्या अडचणी संदर्भात पत्रकारांनी प्रश्न लावुन धरल्याने अखेर प्रशासकीय मंजुरी नंतर लागलीच नवीन बसस्थानकाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या संदर्भात यावल तालुक्यातील अनेक गावांच्या बस थाब्यांवर प्रवाशी निवारा नसल्याने होणाऱ्या अडचणी संदर्भात विविध वर्तमानपत्रच्या माध्यमातुन प्रवाशांची ही समस्या प्रसार प्रचार करून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणुन दिल्याने अखेर रावेर विधानसभेचे आमदार हरीभाऊ जावळे यांच्या आमदार निधीतून निधी मंजुर करण्यात आला. आज प्रत्यक्षात हिंगोणा बस थांब्यावर प्रवाशी निवाऱ्या कामास सुरुवात झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी पत्रकारांचे आभार मानले. यावल तालुक्यातील अजुन अनेक गावांच्या बसथांब्यावर प्रवाशी निवारे नाहीत याकडे ही लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, असे आवाहन प्रवाश्यांकडून होत आहे.