यावल महाविद्यालयात “आपले शहर आपला इतिहास” पुस्तकाचे प्रकाशन         

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून “आपले शहर आपला इतिहास ” या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच जळगाव येथील बेंडाळे महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गौरी राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्य डॉ.किशोर कोल्हे व प्रा. एकनाथ नेहेते उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांनी भूषविले.

प्रारंभी डॉ.अनिल पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेत ग्रंथ निर्मितीचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. गौरी राणी यांनी आपल्या मनोगतात कोरोना काळात महाविद्यालयाने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले.

याप्रसंगी डॉ. किशोर कोल्हे व प्रा. एकनाथ नेहेते यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असे विशद केले की यावल शहराची संपूर्ण माहिती व इतिहास एकत्रित करण्याच्या प्रयोजनाने सदर ग्रंथ तयार करण्यात आला आहे.

ग्रंथनिर्मितीसाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले. या ग्रंथासाठी उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, प्रा. मनोज पाटील, प्रा. दिलीप मोरे, प्रा. मुकेश येवले, प्रा. व्ही .व्ही. पाटील, प्रा. प्रवीण पाटील, प्रा.राजेन्द्र थिगळे, प्रा.सी.के.पाटील, प्रा.संजीव कदम व मिलिंद बोरघडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सदर कार्यक्रमास उपप्राचार्य प्रा. अर्जुन पाटील, प्रा.एम.डी.खैरनार, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. सुधीर कापडे, प्रा.शिवराज पाटील, महेंद्र पाटील डॉ. आर. डी.पवार, डॉ.पी.व्ही. पावरा, डॉ .एच.जी.भंगाळे, शिक्षक वृंद व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधा खराटे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. एस. आर. गायकवाड यांनी केले.

 

Protected Content