यावल प्रतिनिधी | भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेशदादा विठू पाटील यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य साधून तालुक्यातील पाडळसे येथे अमृतयोग सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी लेवा पाटीदार समाजातील मान्यवरांनी कुटुंबनायकांचे अभिष्टचिंतन केले.
भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक श्री.रमेशदादा विठू पाटील यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली , त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील अमृतयोग सोहळा दि.९ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील पाडळसे येथील लोकविद्यालय ,पिळोदा रोड येथील माजी विद्यार्थी भवनात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथराव खडसे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. उल्हासदादा पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे , आमदार शिरीषदादा चौधरी , आमदार राजुमामा भोळे , जळगावच्या महापौर जयश्री सुनील महाजन , जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्षा रोहिणी खडसे – खेवलकर, लेवा पंचायतचे युवा अध्यक्ष ललितकुमार पाटील , आमदार संजय सावकारे ,भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे , माजी आमदार दिलीप भोळे , सावदाच्या नगराध्यक्षा अनिता येवले ,सभापती पल्लवी चौधरी , माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे , पोपट तात्या भोळे , प्रभात चौधरी, अमृतयोग गौरव समितीचे व नियोजनाची महत्वाची धुरा सांभाळणारे सामाजिक कार्यकर्ते व कलावंत तुषार वाघुळदे , गिरीश नारखेडे , बी.के.चौधरी ,डॉ.अरविंद कोलते , डी.के.देशमुख , संजय पाटील , मोताळा , ज्ञानदेव खाचणे ,उद्योजक सुबोध चौधरी, प्रवीण झांबरे (गुजरात ); प्रकाश पाटील , संजीव राणे , प्रल्हाद भारंबे , धीरज पाटील ,हेमंत बोंडे ,मोरेश्वर फिरके यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती होती.
या भव्य सोहळ्यात लेवा पाटीदार समाजाच्या चौथ्या महाधिवेशनाचा अहवाल सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. तसेच या अमृत योग सोहळ्यानिमित्त सकल लेवा समाज आयोजित कुटुंब नोंदणी अभियानाचा शुभारंभ कुटुंबनायक रमेश पाटील यांच्या हस्ते झाला. कुटुंबनायक पाटील यांना अमृत योग गौरव समितीच्यावतीने मानपत्र प्रदान करण्यात आले. या गौरव समितीचे मुख्य संयोजक विष्णू रामदास भंगाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अहवाल वाचन केले तर प्रभात चौधरी यांनी मानपत्राचे वाचन केले.
पाहुण्यांचे स्वागत अमृत योग गौरव समितीचे सदस्य ललित रमेश पाटील , प्रभात चौधरी ,जेष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते तुषार वाघुळदे , गिरीश नारखेडे , शरद महाजन , नरेंद्र नारखेडे ,ललित चौधरी , प्रियदर्शिनी सरोदे , गीताताई चौधरी, डॉ.उदय चौधरी , डी.के.देशमुख ,भरत महाजन , जितेंद्र फिरके , दिनेश भंगाळे , संजय पाटील, चेतना पाटील , राजेश वारके आदीनी केले. याप्रसंगी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. भोरगाव लेवा पंचायतीचे कार्यकारिणी मंडळाचे संचालक आणि गौरव समितीच्या सदस्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
पुणे , मुंबई ,धुळे ,मध्यप्रदेश , गुजरात ,बुलडाणा , मलकापूर, नांदुरा , मोताळा , नांदेड – साळवा ,वाघळी , डोंबिवली ,औरंगाबाद आदी भागातून समाजबांधव- भगिनी मोठ्या संख्येने या आनंद सोहळ्यास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना भारंबे यांनी तर आभार जितेंद्र फिरके यांनी मानले.