यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बर्हाटे यांना सेवानिवृत्ती निमित्त हृद्य निरोप देण्यात आला.
आपल्या वैद्यकीय क्षेत्राचा मोठा अनुभव तसेच अभ्यासु व सेवाभाव कार्याने नावलौकीक मिळवणारे येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ हेमन्त बर्हाटे यांचा आपल्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेतुन झाल्याने त्यांचा सेवा निवृतपर कार्यक्रम वैद्यकीय क्षेत्रातील अधिकार्यांच्या उपस्थितीत कौटुंबीक वातावरणात पार पडला.
येथील तालुका आरोग्य अधिकारी म्हणुन कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ हेमन्त भाऊलाल बर्हाटे हआपल्या ३६वर्षाच्या सेवाकार्यानंतर दिनांक ३० एप्रील रोजी आपल्या सेवेतुन सेवा निवृत्त झाले. मुळ पाडळसा तालुका यावल येथील राहणारे व अमरावती येथुन वैद्यकीय शिक्षण पुर्ण करणारे डॉ हेमन्त भाऊलाल बर्हाटे यांनी १९८६मध्ये त्यांनी पाडळसा तालुका यावल या आपल्या जन्मभुमीतुनच वैद्यकीय अधिकारी म्हणुन आपले सेवाकार्यास सुरुवात केली. त्यांनतर त्यांनी १९ ८९ते १९९३ थोरगव्हाण तालुका रावेर नंतर १९९३ते २००३या कालावधीत भालोद तालुका यावल येथील प्राथमिक आरोग्य केन्द्रात वैद्यकीय अधिकारी म्हणुन कार्य केले. २००३ते २००४ असे एक वर्ष भादली तालुका जिल्हा जळगाव व पुढील एक वर्ष नंतर वराडसिम तालुका भुसावळच्या प्राथमिक आरोग्य केन्द्र येथे व२००४ ते २००५ते २००९या कालावधीत त्यांनी बोदवड तालुका वैद्यकीय अधिकारी पदावर आपली सेवा बजावली. यानंतर पुढील अकरा वर्षे त्यांनी २००९ते २०२२या कार्यकाळात तालुका आरोग्य अधिकारी म्हणुन सेवाकार्य केलीत.
यावल येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयात आयोजीत एका छोटेखानी कौटुंबीक कार्यक्रमात त्यांचा सेवानिवृत्तीपर निरोपाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ . छाया हेमंत बर्हाटे या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी. आर. पाटील , डॉ. संजय सोनवणे , डॉ. एस. बी. सोनवणे यांच्यासह पाडळसा, भालोद , साकळी , किनगाव , सावखेडा सिम या प्राथमिक आरोग्य केन्द्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी व पंचायत समितीचे सर्व अधिकारी आणी कर्मचारी तसेच ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रुबाब तडवी , सचिव पुरूषोत्तम तळेले, सहसचिव हितेन्द्र महाजन , ग्रामसेवक उल्हास पाटील ,कार्यक्रमास उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नरेन्द तायडे यांनी केले.