यावल प्रतिनिधी । यावल पं.स. गटविकास अधिकारी म्हणुन दिंडोरी जिल्हा नाशिक येथे पंचायत समितीला सहाय्यक गट अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले एन.एस. पाटील यांची पदोन्नती झाल्याने त्यांना यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणुन नियुक्त करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्विकारला.
यावल पंचायत समितीला मागील दोन वर्षांपासुन नियमित गटविकास अधिकारी नसल्याने तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील कामाचा चांगलाच गोंधळ उडालेला असुन अनेक समस्या प्रश्न अडचणी हे ग्रामस्थांचे अद्याप प्रलंबीत आहे. नव्याने यावल पंचायत समिती नियमित गटविकास अधिकारी एन.एस.पाटील हे मिळाले असुन त्यांना प्रशासकीय कामाचा चांगला अनुभव असल्याने तालुक्याच्या ग्रामीण विकासाच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामीण क्षेत्रातील नागरीकाकंडुन व्यक्त करण्यात येत आहे.