यावल प्रतिनिधी । बोलेरो वाहतून सहा गुरांना कत्तलीसाठी घेऊन जाणार्याला आज सकाळी पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २३ जुन बुधवार रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास टी पाँईटवर कार्यरत असलेल्या पोलीसांना एका बोलेरोतून गुरांची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. याच्या आधारावर चोपडयाहुन यावलकडे येणार्या एमएच ४३ बी बी ०४०९या बुलेरो वाहनाची पोलीसांनी चौकशी करून तपासणी केली असता यात पाच ते सहा वर्ष वयातील ६ बैल (गोवंश ) आढळुन आलीत.
या संदर्भात यावल पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोलेरो वाहनचालक दगडू आनंदा साळुंके (वय ४०; राहणार लोहीया नगर चोपडा) याच्या विरूध्द महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम१९७६व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कलम अधिनियम१९१५चे कलम ५ ( अ ) (ब) तसेच प्राण्यांना निर्धत्येने वागाविण्या बाबतचे कलम ११ ( ई )प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी वाहन चालकासह वाहन ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक अजमल खान पठाण, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, पोलिस अंमलदार राहुल चौधरी, असलम खान, वाहनचालक रोहील गणेश यांच्या पथकाने केली.