यावल ( प्रतिनिधी)। येथे नुकत्याच पार पडलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयती व बुध्दजयंती निमीत्ताने येथील रिपाइं (अ) तर्फे सोमवारी सायंकाळी येथील आठवडे बाजारात सुप्रसिद्ध गायीका पंचशिला भालेराव यांचा भिमगीतांचा कार्य्रकम आयोजीत करण्यात आला होता.
शिक्षणा अभावी इतीहासात समाजबांधवांची काय दशा होती. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला जो शिक्षणाचा संदेश व उपदेश दिला आणि त्यांनतर समाज आजची अवस्था काय आहे? याचे वर्णन करतांना गायीका पंचशिला यांनी ‘मया भिमा….नं सोन्या….नं भरली ओटी’ या गाण्यानं उपस्थीत प्रेक्षकांची मने जिंकली. अक्षरश: या गाण्यावर स्त्री -पुरष थिरकले होते. यावेळी गाईकाही मंचावरून खाली उतरून त्यांना साथ दिली. या गाण्यासह अनेक गाण्यामधुन बाबासाहेबांच्या भावनिक आठवणींना त्यांनी उजाळा दिला व समाजप्रबोधन केले.
कार्यक्रमास येथील महावद्यालयाचे प्राचार्य डॉ.एफ.एन. महाजन, रिपाइंचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, आनंद बाविस्कर, जगन सोनवणे, रविंद्र खरात यांच्यासह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थीत होते. यशस्वितेसाठी रिपाई तालुकाध्यक्ष अरूण गजरे, विशाल गजरे, संतोष गजरे, मुश्ताक शे. हसन, विकी भालेराव, सागर गजरे आदींनी पारिश्रम घेतले.