कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात धडक कारवाई

यावल प्रतिनिधी | प्रशासनाने जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांच्या विरोधात आज सकाळपासून नगरपालिका आणि पोलिसांनी संयुक्तरित्या मोहिम सुरू केली असून यात संबंधीतांना दंड ठोठावण्यात येत आहे.

सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढीस लागली आहे. या अनुषंगाने आरोग्य प्रशासन सर्तक झाले असुन, जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये यावल नगर परिषद प्रशासनाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने संयुक्तपणे कोवीड१९चे नियम न पाडण्यार्‍यांवर नागरीकांवर कार्यवाहीस सुरूवात केली आहे.

यावल शहरातील बुरूज चौकात आज सकाळ पासुन जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्या आदेशान्वये नगर परिषदचे मुख्यधिकारी अविनाश गांगोडे यांच्या व पोलीस निरिक्षक सुधीर पाटील , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व स्थानिक पोलीस कर्मचारी भुषण चव्हाण, राहुल चौधरी , निलेश वाघ , के पी पवार, पोलीस वाहनचालक सिकंदर तडवी तथा नगर परिषदचे प्रशासनाचे कर्मचारी यांनी शहरातील विना मास्क वाहनचालक व व्यवसायीकांवर कार्यवाहीला सुरूवात केली आहे.

याच्या अंतर्गत सकाळच्या सत्रात सुमारे ३०ते ३५ विना मास्क फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई आतापर्यंत करण्यात आली आहे. आरोग्य प्रशासनाकडुन वारंवार कोरोना संसर्गा संदर्भात जनजागृती व्हावी याकरीता विविध माध्यमातुन कोवीड१९च्या प्रसार थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतांना ही बरेच नागरीक हे गाफील असल्याचे दिसुन येत आहे. यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने केले आहे.

Protected Content