यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणार्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की तालुक्यातील एका खेड्यात राहणार्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे लोकेश कडू सोनवणे वय३० वर्ष याने अपहरण करीत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे .पोलीसानी शोध घेत त्या संशयीत तरूणास अटक केली असून , दरम्यान त्या अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
दरम्यान अत्याचार करणार्या लोकेश सोनवणे विस्द्ध बालकांचे लैंगिक् अत्याचारा पासुन संरक्षण कायदा पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत तरूणास भुसावळच्या अतिरिक्त जिल्हा व उच्च न्यायालयाच्या विशेष न्यायालयात त्यास हजर केले असता २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास यावलचे पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर व पोलीस करीत आहे.