यावल प्रतिनिधी । येथील हिंदु जनजागृती समितीतर्फे आज दि. 27 ऑगस्ट रोजी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, येथे देहली विद्यापीठात स्वातंत्र्य वीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हुतात्मा भगतसिंग यांची त्रिमूर्तीचे एकत्र बसवलेले पुतळ्यांना 21 ऑगस्ट रोजी रात्री काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया एनएसयुआय विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोही कार्यकर्त्यांनी सावरकर यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घातला. ही घटना अत्यंत संतापजनक असून या घटनेतील संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, याचबरोबर विविध मागण्यांचे निवेदन आज तहसीलदार जितेंद्र कुवर यांना देण्यात आले आहे.
मागण्यांचे निवेदन
कागदी लगद्यापासून बनवण्यात येणाऱ्या गणेशमूर्तींना शासनाने प्रोत्साहन देणे थांबवावे, जम्मू-काश्मीर मधून कलम 370 व 35 ठेवल्याप्रकरणी केंद्र सरकारचे अभिनंदन आणि कश्मीर हिंदूंचे पुनर्वसन करण्याबाबत, हजारो कोटी रुपयांचे घोटाळे, तिथे वाढते लैंगीक अत्याचार पाहता त्यावर शासनाने नियंत्रण आणण्यासाठी चर्चेचे सरकारीकरण करावे, धर्मनिरपेक्ष सरकारकडून अल्पसंख्यांकाच्या तुष्टीकरणासाठी क्रिश्चन फास्टर इस्लामी मौलवी मौलाना यांच्या मासिक वेतन देण्याच्या निर्णय रहित करण्याविषयी निवेदन देण्यात आले असून याचबरोबर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर केलेल्या अर्थसंकल्पात घोषित केले असुन यात शिक्षण फास्टर मुस्लिम आणि मौलाना यांना मासिक वेतन देण्यासंदर्भातील आर्थिक वर्षाकाठी तब्बल 948 72 कोटींची तरतूद केली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय धार्मिक भेदभाव आणि पक्षपात करणारा असून विशिष्ट जाती-धर्माच्या मतपेटी जपण्यासाठी घेतलेल्या असल्याचं त्यांनी म्हटला असून शासनाने घेतलेल्या निर्णयाचा विरोध करण्यात आला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे दिवंगत कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी याबाबत अपप्रचार केला होता. त्यांच्या प्रभावाखाली शासनाने पर्यावरण विभागाने या दिवशी सणांचे पर्यावरणपूरक साजरीकरणासाठी मार्गदर्शन केले होते. त्याचप्रमाणे जय श्रीराम अशा घोषणा देण्यास भाग पाडून मारहाण झाली असा खोटा कांगावा करणाऱ्यांनी अपप्रचार करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, याविषयी देखील एक निवेदन देण्यात आले आहे. अनेक सोशल नेटवर्कवर आम्हाला जबरदस्त जय श्रीराम म्हणून घोषणा द्या व जमावाने मारहाण केली. या सांगून अशा घटनांच्या सोशल नेटवर्कर व्हायरल होणारे व्हिडिओ बद्दल हिंदू जनजागृती समितीने आक्षेप म्हणून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात यावी, असे निवेदन देखील देण्यात आले आहे.
या निवेदनावर प्रशांत जुवेकर, धीरज भोळे, अजय नेवे, चेतन भोईटे, विशाल सावकारे, लखन राऊत, शिवाजी बारी, किरण बारी यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहे.