यावल प्रतिनिधी । येथील महसुल प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरीत क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्ताने (दि.1 जूलै) रोजी कृषीदिन म्हणून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत आदरांजली वाहण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, येथे तहसीलदार यांच्या दालनात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार, बी.ई.पाटील, संतोष पाटील, युनुस शेख, संजय गांधी विभागाचे रहेमान तडवी, तहसीलचे कार्यालयीन लिपीक प्रशांत पाटील, दिपक बाविस्कर, सुयोग पाटील, निशा चव्हाण, कार्यालयीन कर्मचारी समाधान कोळी यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहुन माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांची जयंती १ जुलै कृषी दिन साजरा करुन आदरांजली वाहीली. त्याचप्रमाणे येथील पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजित ठाकरे व पोलीस कर्मचारी यांनी देखील मा. मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहण्यात आली आहे.