यावल प्रतिनिधी । तालुक्यातील विविध विद्यालय, महाविद्यालयात, पंचायत समिती त्याचप्रमाणे प्रभात विदयालय शाळेतमध्ये ‘विश्व योग दिवस’ साजरा करण्यात आला आहे.
“एककेंद्री शांत मन, निरोगी, उत्साही व दिर्घ आयुष्यासाठी नियमित योगा लाभदायक आहे” असे याप्रसंगी ए.जे. पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना योगाचे दैनंदिन आयुष्यातील महत्व समजून देत मुख्याध्याप ए. सी. पाटील यांनी यावेळी योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी, मुख्यध्यापक ए.सी. पाटील, ए.जे. पाटील, पर्यवेशक ए.बी. सोनवणे, सिध्देश्वर वाघुळंदे तसेच विदयार्थी आदी उपस्थित होते.
त्याचबरोबर, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील क्रीडा संचालक प्रा. सुभाष वानखडे यांनी शरीर संवर्धनासाठी योगाचे महत्त्व स्पष्ट केले, योगा पासून मिळणारे शारीरिक व मानसिक लाभ यासंदर्भात मार्गदर्शन केले. त्यांनी विविध आसनांचे फायदे सांगितले. तर दयाराम गायकवाड या एस.वाय.बी.ए.च्या विद्यार्थ्याने विविध आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले. प्राचार्य डॉ.एफ.एन. महाजन यांनी याप्रसंगी विचार व्यक्त केले की, वर्तमानातील धावपळीच्या जीवनात स्वतःचं शरीर चांगले ठेवणे खूप गरजेचे आहे. बुद्धिमत्ता असून उपयोग नाही, त्यासाठी शरीर निरोगी राहणे गरजेचे आहे; त्यासाठी विशिष्ट प्रकारची आसने नित्यनियमाने करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो प्रमुख डॉ. पी. व्ही. पावरा यांनी केले. तर प्रा.डॉ.सुधा खराटे यांनी आभार व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर, कर्मचारी व विदयार्थी आदी उपस्थित होते.