यावल तालुक्यातील शेतकरी फळपिक विम्यापासून वंचित; महाविकास आघाडीचे निवेदन

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांना हवामानावर आधारित तापमानाच्या निकषाच्या गोंधळात तालुक्यातील शेतकरी डावलण्यात आल्याने शेतकऱ्यांना या पिक विम्याचा लाभापासुन वंचित व्हावे लागत असल्याने अन्याय केला जात आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळावा या मागणीसाठी यावलचे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व प्रभारी तालुका कृषी अधिकारी सागर सिनारे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ( शरदचंद्र पवार ) गटाचे तालुका अध्यक्ष प्रा .मुकेश येवले , विजय पाटील , काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कदीर खान , अनिल जंजाळे ,शिवसेना ( उबाठा ) चे यावल शहराध्यक्ष जगदीश कवडीवाले व संतोष धोबी यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते व केळी उत्पादक शेतकरी बांधव उपस्थित होते .

Protected Content