यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील तालुका कॉंग्रेस कमेटीच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावल येथील तालुका सहकारी शेतकी संघात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने त्यांना जिल्हा परिषदचे माजी सदस्य व खरेदी विक्री संघाचे संचालक प्रभाकर सोनवणे यांच्या हस्ते सत्य , अहिंसा, समानता , न्याय या तत्तवांच्या माध्यमातुन स्वातंत्र प्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी यावल तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, यावल शहराध्यक्ष कदीर खान, कोरपावलीचे माजी सरपंच जलील पटेल,शहरउपाध्यक्ष अनिल जंजाळे, नावऱ्याचे माजी सरपंच समाधान पाटील, काँग्रेस कमेटीचे यावल तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, कोरपावलीचे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक धनराज कोळी, सिद्धार्थ जंजाळे आणि सहकारी यावेळी उपस्थित होते.